कोल्हापूर/प्रतिनिधी
जिंकणं आणि हारणं हे महाडिक कुटुंबीयांचं संकट नव्हे, ज्यावेळी देव संकट आणेल तेव्हाच या महाडीकांवर संकट असेल. पृथ्वी गोल आहे. माणसाची नीतिमत्ता चांगली असेल तर सर्व गोष्टी चांगल्या होतात, अशी दिलखुलास प्रतिक्रिया माजी आमदार महादेवराव महाडिक (mahadevrao mahadik) यांनाी पुतणे धनंजय महाडिक (dhananjay mahadik) यांच्या विजयानंतर दिली. त्यांनी तरुण भारतशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली.
राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपचे धनंजय महाडिक विजयी होताच माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दिलखुलास प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूरचे लोक प्रामाणिक आहेत या जनतेने मला खूप प्रेम दिले आहे त्याची परतफेड महाडिक नेहमी करत असतो. राजकारणात वजाबाकी होत असते पण त्याचे राजकारण कधी केले नाही स्वतःचे धंदे सांभाळून कधीही राजकारण केले नाही. मी जे पेरलं आहे तेच आता उगवून येत आहे. जनतेने जे दिले ते आयुष्यभर संपणार नाही, अशी प्रतिक्रिया महादेवराव महाडिक यांनी दिली.
जनतेने मला दीर्घायुष्य दिले आहे. जनतेने मला दिले मी त्यांना देत राहीन. त्या कामातूनच मी मोठा झालो आहे. जिल्ह्याची राजकारणाची दिशा बदलणार नाही. चांगले राजकारण असते तेच टिकते. स्वार्थ ठेवून केलेले राजकारण कधीही टिकत नाही. कोण मला काही म्हणो, त्याचा मी विचार करत नाही. मी नेहमी चांगल्या भावनेने राजकारण करत असतो, असे महाडिक म्हणाले.
या जिल्ह्याला लाख वेळा नमस्कार केला, तर जनतेचे ऋण फीटणार नाही. ही लोकसभेची रंगीत तालीम आहे. असं समजून या निवडणुकीला आम्ही उतरलो होतो. महाडिकांना लढाईची सवय आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. असेही महाडिक म्हणाले.
मी कोणाला सल्ला देणार नाही, फुकट सल्ला देणार नाही. जोपर्यंत माझ्याकडे येणार नाही तोपर्यंत कोणालाही सल्ला देणार नाही. राजकारणात ज्या पद्धतीने जातो त्या पद्धतीने तो राजकारणात टिकतो. जर लक्ष्मण रेषा ओलांडली आणि सितामाई गेली तसे राजकारणात होते. माणसाने राजकारणात लक्ष्मण रेषा आखली पाहिजे, असे महाडिक म्हणाले