Rajaram Election Results Update : राजाराम साखर कारखाना निवडणूक मतमोजणीत पहिल्या फेरीत महाडिक गटाचे सर्व उमेदवार जवळपास 800 ते 900 मतांनी आघाडीवर होते. पहिल्या पाच फेरीत महाडिक गटाचे 13 उमेदवार आघाडीवर आल्यावर सकाळपासून महाडिक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक विजयी होताच गुलालची मुक्त उधळण करत महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांना डोक्यावर घेऊन कार्यकर्त्यांनी नाचत जल्लोष साजरा केला. एवढच नाही तर महादेवराव महाडिक यांनी कार्यकर्त्यासमोर शिट्टी वाजवत शड्डू ठोकून आनंद साजरा केला. या विजयी क्षणाचे खास फोटो फक्त तरूण भारतच्या वाचकांसाठी….चला तर पाहूयात.












