Rajaram SugarFactory Election : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी आज (दि. 23) रोजी मतदानाला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली.हे मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी 58 केंद्रावर 580 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, माजी आमदार महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांनी सेंट झेव्हीयर्स मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. महादेवराव महाडिक हे जिल्ह्याचे जादूगार आहेत निकाल सांगण्याची गरज नाही. छत्रपती राजाराम कारखान्याची निवडणूक आम्हीच जिंकणार असा विश्वास महाडिक गटाने व्यक्त केला.
छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीची रणधुमाळी गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महाडिक- पाटील गट आमने- सामने आल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. जाहीर सभांमधून गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी शुक्रवारी थंडावल्या. आता मतदानाकडे लक्ष लागले आहे. प्रशासनाकडून ही मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे. शनिवारी मतदानासाठी बहुउद्देशीय हॉल रमण माळा येथे साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रत्येक केंद्रासाठी दहा असे एकूण 580 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी उपस्थित आहेत. तसेच सहा विभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक अधिकाऱ्याकडे आठ ते दहा केंद्र देण्यात आले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









