मंत्री विश्वजित राणे यांची माहिती
वाळपई : भाजपाचे महासंपर्क अभियान वाळपई व पर्ये मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. यातून प्रत्येक घरोघरी संपर्क साधण्यात येणार असून नऊ वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य घरोघरी पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी वाळपईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट केली आहे. भाजपने एक महिना महासंपर्क अभियानाच्या आयोजन केलेले आहे .या महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून केंद्रीय सरकारने केलेले चांगले कार्य व घेतलेले धाडसी निर्णय या संदर्भाची माहिती घरोघरी पोहोचविणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी बुथ कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे विविध पंचायतीचे सरपंच, पंचसभासद भाजपाचे कार्यकर्ते यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे. यामुळे भाजपचे कार्य नागरिकांकडे प्रभावीपणे पोचविणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी वाळपई व पर्ये मतदार संघामध्ये विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे .या उपक्रमांना चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभेल अशी आशा आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केलेली आहे.
दरम्यान, यासंदर्भाची एक महत्त्वाची बैठक नुकतीच संपन्न झाली .या बैठकीमध्ये सत्तरी तालुक्यातील विविध पंचायतीचे सरपंच, पंच सभासद, भाजपचे कार्यकर्ते, नगरपालिकेचे नगरसेवक यांची खास उपस्थिती होती. या बैठकीला विश्वजीत राणे यांनी मार्गदर्शन केले .यावेळी त्यांनी बोलताना भाजपाच्या महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांना सर्वांनी चांगल्या प्रकारचे सहकार्य देण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. वाळपई व पर्ये मतदारसंघांमध्ये विकासाची गंगा सुरू झालेली आहे. येणाऱ्या काळात विकासाला आणखी चालना द्यायची असेल तर महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून घरोघरी प्रचार करून भाजपाचे कार्य प्रत्येकाकडे पोहोचविणे अत्यंत गरजेचे आहे अशा प्रकारची विनंती यावेळी त्यांनी केली. आतापर्यंत भाजपाचे कार्य विस्तारित करण्यासाठी सर्वांनी चांगल्या प्रकारचे योगदान दिलेले आहे. येणाऱ्या काळातही अशाच प्रकारच्या योगदानाची अपेक्षा राणे यांनी व्यक्त केलेली आहे. 2024 साली केंद्रीय सरकार निवडण्यासाठी निवडणूक होणार आहे .यातून दोन्ही मतदारसंघातून भाजपाला जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी महासंपर्क अभियान महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे .यामध्ये तऊण ते ज्येष्ठ मतदार यांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे .त्यांनाही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम देण्यात येणार असून त्यासंदर्भाची सविस्तर माहिती येण्राया काळात देण्यात येणार आहे असे मंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केले आहे. वाळपई व पर्ये मतदार संघातील सर्व ग्रामपंचायती सध्यातरी भाजपच्या ताब्यात आहेत. त्याचप्रमाणे नगरपालिकासुद्धा भाजपाच्या ताब्यात आहेत. यामुळे महासंपर्क अभियान सर्व भागांमध्ये यशस्वीपणे राबविले जाणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.









