ब्यूनॉस आयर्स
दक्षिण अमेरिकन देश अर्जेंटीनामध्ये शनिवारी पहाटे 3.39 वाजता भूकंपाचा धक्का जाणवला आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.5 इतकी नोंदली गेली आहे. भूकंपाच्या या धक्क्यात कुठल्याही प्रकारच्या जीवित तसेच आर्थिक हानीचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. भूकंपाच्या धक्क्यामुळे अर्जेंटीनामध्ये काही काळ भीतीचे वातावरण दिसून आले आहे.









