रुशाद रतनजी उत्कृष्ट गोलरक्षक
बेळगाव : बेंगळूर येथील ब्लू आकादमी फुटबॉल क्लब आयोजित 8 वर्षाखालील आंतर क्लब फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या मॅजिक स्पोर्ट्स संघाने उपविजेतेपद पटकाविले. रुशाद रतनजी याला उत्कृष्ट गोल रक्षक म्हणून तर मॅजिक स्पोर्ट्स क्लब उत्कृष्ट संघाने गोरविण्यात आले. या स्पर्धेत उत्कृष्ट गोलरक्षन करणाऱ्या रूशादला उत्कृष्ट गोल रक्षक म्हणून गोल्डन हॅन्ड चषक हा किताब दिला गेला. फुटबॉल प्रशिक्षक ओवेज तेरणी यांचे मार्गंदर्शन लाभत आहे. रुशादला आई-वडील व इतर सहकाऱ्यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









