फॅबलिग 14 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : फॅब स्पोर्ट्स क्लब आयोजित फॅब साखळी पद्धतीच्या 14 वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत मॅजिक स्पोर्ट्स क्लब, जॉन एफ.सी., रेग एफ.सी., सीएसआरएफ अकादमी संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभव करुन विजयी सलामी दिली. सक्षम स्पोर्ट्स इरीनाच्या टर्फ मैदानावर खेळविण्यात आलेल्या या फॅबलिग फुटबॉल स्पर्धेत पहिल्या सामन्यात पायोनियर संघाला बीटा स्पोर्ट्सने शुन्य बरोबरीत रोखले. या सामन्यात सिप्तन हुसेन याला उत्कृष्ठ खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. दुसऱ्या सामन्यात मॅजिक स्पोर्ट्स क्लबने रेग एफ.सी.चा 2-1 असा पराभव केला. मॅजिकतर्फे सुमीत गगनकर आणि अब्दुलमतीन सय्यद यांनी गोल केले.
तर रेग एफ.सी.तर्फे जिरोमिया डिसोजा यांनी गोल करुन अब्दुल सय्यदला उत्कृष्ठ खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. तिसऱ्या सामन्यात जॉन एफ.सी.ने रिगीमा स्पोर्ट्स संघाचा 3-0 असा पराभव केला. जॉन एफ.सी.तर्फे आदेश पाटील, तन्मय गुरव तर अथर्व खांडेकर यांनी गोल केले. तन्मय गुरवला उत्कृष्ठ खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले. चौथ्या सामन्यात रेग एफ.सी.ने ग्रो स्पोर्ट्सचा 2-0 असा पराभव केला. रेग एफ.सी.तर्फे ओम पाटीलने दोन गोल केले. त्याला उत्कृष्ठ खेळाडू म्हणून पारितोषिक देण्यात आले. पाचव्या सामन्यात सीएसआरएफ अकादमीने एमव्हीएमचा 4-1 असा पराभव केला. सीएसआरएफतर्फे विरन दासरने 2, झियान शहापुरीने व ओजस जमादार यांनी प्रत्येकी 1 गोल केला. विरन दासरला उत्कृष्ठ खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.









