वृत्तसंस्था/ इस्टबोर्न
डब्ल्यूटीए टूरवरील शनिवारी येथे झालेल्या इस्टबोर्न महिलांच्या आंतरराष्ट्रीय ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत अमेरिकेची महिला टेनिसपटू मॅडिसन किजने एकेरीचे जेतेपद पटकावले.
या स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात मॅडिसन किजने डेरिया कॅसेटकिनाचा 6-2, 7-6 (15-13) असा पराभव केला. हा अंतिम सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. मॅडीसन किजने या स्पर्धेत दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले आहे. यापूर्वी तिने 2014 साली ही स्पर्धा जिंकली होती. मॅडीसन किजचा विम्बल्डन स्पर्धेत सलामीचा सामना ब्रिटनच्या सोना कार्टलशी होणार आहे.









