वृत्तसंस्था/ राऊरकेला (ओडिशा)
येथील बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर सुरु असलेल्या 2023 च्या हॉकी इंडियाच्या 13 व्या कनिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत 6 व्या दिवशी मध्यप्रदेश आणि मिझोराम यांनी प्रतिस्पर्ध्यावर विजय नोंदविले.
या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मध्यप्रदेशने कर्नाटकाचा 7-1 अशा गोल फरकाने पराभव केला. मध्यप्रदेशतर्फे कर्णधार योगिता वर्मा, ज्योती सिंग, सोनिया कुमारी, गुरुमेल कौर, सोनम यांनी प्रत्येकी 1 गोल तर भुमिक्षा सिंगने 2 गोल केले. कर्नाटकातर्फे एकमेव गोल यमुनाने नोंदविला.
दुसऱ्या एका सामन्यात मिझोरामने चंदीगडचा 6-0 असा एकतर्फी पराभव केला. या स्पर्धेतील अन्य सामन्यात हरियाणाने तेलंगणाचा 24-0 असा दणदणीत पराभव केला. राजस्थान आणि आसाम यांच्यातील सामना 4-4 असा बरोबरीत राहिला. तामिळनाडू आणि मनिपूर यांच्यातील लढतही 3-3 अशी बरोबरीत राहिली.









