वृत्तसंस्था / काकीनाडा
हॉकी इंडियाच्या येथे सुरू असलेल्या कनिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत मध्यप्रदेश, हरियाणा, झारखंड आणि ओदीशा यांनी आपल्या गटातील सामने जिंकले आहेत.
अ गटातील झालेल्या सामन्यात मध्यप्रदेशने चंदीगडचा 5-0 अशा गोल फरकाने एकतर्फी पराभव केला. मध्यप्रदेश संघातील कृष्णा शर्माने दोन गोल तर काजल, आयुषी पटेल आणि अनु यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात हरियाणाने बंगालचे आव्हान 7-1 अशा गोलफरकाने संपुष्टात आणले. झारखंडने कर्नाटकाचा 2-0 असा पराभव केला. ओदीशाने आंध्रप्रदेशचे आव्हान 3-1 असे संपुष्टात आणले. ब गटातील झालेल्या सामन्यात उत्तराखंडने पुडूचेरीचा 11-0 अशा गोलफरकाने मोठा पराभव केला. तर तामिळनाडू आणि दिल्ली यांच्यातील सामना 3-3 असा गोल बरोबरीत राहीला.









