दोडामार्ग – वार्ताहर
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठातून घेण्यात आलेल्या स्पर्धेतून सर्वेश मधुसूदन खांबल पोस्टर पेंटिंगमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. नाशिक येथे झालेल्या ८ विभागाच्या स्पर्धा मधून रावसाहेब गोकाटे कॉलेज ऑफ कॉमर्स श्रीमती सरस्वती बाई गणशेट वाळके कॉलेज ऑफ आर्ट्स संचलित दोडामार्ग अभ्यास केंद्रांचा विद्यार्थी प्रथम क्रमांक घेऊन यशश्वी झाला आहे. आणि जळगाव येथे होणाऱ्या इंद्रधनुष्य या स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. अभ्यासकेंद्राचे केंद्रसंयोजक प्रा. दशरथ विठ्ठल राजगोळकर यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या विद्यार्थ्याने अभ्यासकेंद्राचे तसेच आपल्या दोडामार्ग तालुक्याचे नाव इंद्रधनुष्य स्पर्धेपर्यंत पोचविल्याने तसर्वेश याचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.









