वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये कंग्राळी बुद्रुक येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी माधुरी पाटीलने वैयक्तिक खेळामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. माधुरीने 100 मी. 200 मी. धावणेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. तिची जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. माधुरीला शाळेचे मुख्याध्यापक, क्रीडाशिक्षक व इतर शिक्षकवर्ग, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष, सदस्यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळत आहे.









