सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथील अमर लॉन्ड्रीचे मालक तथा परीट समाज संघटनेचे माजी सल्लागार श्री.मधुकर मुकूंद मोरजकर (वय 86)यांचे आज ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, मुलगी, भाऊ, बहिण असा परिवार आहे.अभिनव फाऊंडेशनचे खजिनदार जितेंद्र मोरजकर यांचे ते वडील होत.









