चित्रपटासाठी केले ट्रान्सफॉर्मेशन
अभिनेता माधवन सध्या स्वत:चा आगामी चित्रपट ‘जीडीएन’वरून चर्चेत आहे. हा चित्रपट प्रत्यक्षात ‘भारताचे एडिसन’ जी.डी. नायडू यांचा बायोपिक आहे. याचा फर्स्ट लुक अलिकडेच समोर आला आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये माधवनने पुन्हा एकदा स्वत:च्या ट्रान्सफॉर्मेशनने चकित केले आहे. आर. माधवनने चित्रपटाचा टीझर शेअर करत ‘जी.डी. नायडू यांचे स्पिरिट आता अधिकृतपणे समोर आले आहे, ही एक अशी कहाणी आहे, ज्यात बेजोड व्हिजन, मोठी एम्बिशन आणि पक्का निर्धार आहे’ असे कॅप्शनदाखल नमूद केले आहे. चित्रपटातील माधवनचा लुक पाहून चाहते चकित झाले आहेत. ‘जीडीएन’ चित्रपटात आर. माधवनसोबत प्रियामणि, जयराम आणि योगी बाबू यासारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन कृष्णकुमार रामकुमार करत आहेत. वर्गीस मूलन पिक्चर्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. माधवन याचबरोबर अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंहसोबत ‘दे दे प्यार दे 2’मध्ये दिसून येणार आहे. हा चित्रपट 14 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.









