प्रकाशराव जमदाडे यांचे प्रयत्न अन संजयकाका यांची साथ
माडग्याळ प्रतिनिधी
पाणी उशाला व कोरड घशाला अशा असल्याची बातमी दैनिक तरुण भारत मध्ये झळकताच प्रशासनाला व राजकीय मंडळींना जाग घेऊन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय प्रकाशराव जमदाडे यांच्या अथक प्रयत्नाला यश येऊन माडग्याळकरांना मायथळ कॅनल मधून थोड्याच दिवसात पाणी मिळणार आहे.
मायथळ कॅनॉल मधून माडग्याळ ओढ्यात पाणी सोडनेसाठी खासदार संजयकाका पाटील यांनी त्यांच्या खासदार फंडातून 12 लाख मंजुरीचे पत्र अधीक्षक अभियंता श्री पाटोळे साहेब यांना दिले यावेळी कार्यकारी अभियंता श्री पवार साहेब,कार्यकारी अभियंता श्री कोरे साहेब,कार्यकारी अभियंता श्री हारगुडे साहेब ,रवी सावंत,शिवप्पा तावाशी,मोहन उर्फ भैय्या कुलकर्णी,अविनाश गडीकर,अविनाश सावंत,मिलिंद बापू पाटील व उपअभियंता खरमाटे साहेब ,प्रमोद अप्पा शेंडगे उपस्थित होते . माडग्याळच्या पश्चिमेवरून मोठा कॅनल पुढे उमदी व मंगळवेढा ताालुक्याकडे गेला आहे.
माडग्याळच्या शिवारातून पाणी गेले आहे, परंतु माडग्याळला याचा काहीही फायदा होत नव्हता. म्हणून गेले तीन वर्षापासून प्रकाशराव जमदाडे व माडग्याळ मधील सर्व प्रमुख कार्यकर्ते प्रयत्न करीत होते. खासदार संजयकाका पाटील यांना पाच सहा वेळा भेटून पाणी कस येणार आहे, हे समजून सांगितले. परंतु काही हेकेखोर राजकीय मंडळी मुळे कामाचे श्रेय दुसऱ्याला जाईल म्हणून आडवणूक केली जात होती. स्वार्थी लोकाकडून श्रेय वादासाठी जाणून बुजून अडचणी आणल्या गेल्या आज 22 ऑगस्ट रोजी संजयकाकांनी सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दायनिधी यांना वस्तुस्थिती सांगितली. तसेच खर्चस मंजुरी देण्याची विनंती केली. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री कपोले साहेब यांचेशी फोन वरून संपर्क साधून सदरची चर खोदणे कसे आवश्यक आहे, हे समजून सांगत महामंडळ कडील मशिनरी देणेची विनंती केली. ती अभियंता कपोले यांनी ही मागणी मान्य केली, खासदार फंडातून डिझेल साठी 12 लाख रु चे पत्र तयार करून दिले लवकरच कामास सुरवात होऊन बऱ्याच दिवसाची माडग्याळ कराची प्रतीक्षा संपणार आहे.
यासाठी माजी आमदार विलासराव जगताप यांनी ही सध्या जत तालुक्यात भीषण पाणीटंचाई आहे. लवकर काम करून दिलासा द्यावा अशी विनंती केली, हे काम पूर्ण झाले नंतर माडग्याळ, कुलाळवाडी , सोन्याळ, उटगी,निगडी बु,उमदी या गावांना लाभ होणार असून दोड्ड नाला माध्यम प्रकलप भरला जाणार आहे. या कामासाठी खासदार संजयकाका पाटील यांनी सततच्या केलेल्या पाठपुराव्यामुळे व योगदानामुळे त्यांचे व सर्व अधिकारी यांचे माडग्याळ पंचक्रोशीतील शेतकरी व नागरिक यांचे वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.








