माडग्याळ वार्ताहर
Sangli Weather Update : माडग्याळ व परिसरातील सोन्याळ,व्होसपेठ,गुड्डापूर,लांडेवाडी आदी परिसरात अवकाळी पावसाने झोडपले.यामुळे द्राक्ष, डाळींब व बेदाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.द्रक्ष व बेदाणे निर्माण हंगाम सद्या जोरात सुरू आहे शुक्रवारी सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान जोराचा पाऊस झाला.यामूळे काढणीस आलेल्या द्राक्ष व डाळिंब बागेचे नुकसान झाले बेदाणे भिजल्याने काळे पडून लाखों रुपयांचे नुकसान होणार आहे.
आज शुक्रवार माडग्याळचा आठवडा बाजार असतो बाजारासाठी आलेल्या छोट्या व्यावसायिकांना या अवकाळी पावसामुळे मोठा फटाका बसला आहे अचानक पाऊस आल्यामुळे किराणा मालाचे व भाजीपाला व अनेक छोट्या व्यावसायिकांचे मार भिजल्यामुळे नुकसान झाले आहे. आगोदरच अडचणीत असणारा शेतकरी आणखीनच अडचणीत येणार आहे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून जाणार आहे.या भागातील जवळपास नव्वद टक्के द्राक्षाची बेदाणा निर्मिती केली जाते . निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे.बॅंकांची कर्जे कशी फेडावायची याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








