सोनसडा कचराप्रश्नी उच्च न्यायालयाची टिप्पणी
पणजी : सोनसडा कचराप्रश्नी उच्च न्यायालयाने मडगाव नगरपालिकेवर आळशीपणाचा ठपका ठेवून ताशेरे ओढले असून ती समस्या म्हणजे मोठी आपत्ती बनल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी सोनसडा येथे भेट देऊन तेथील परिस्थितीचा खराखुरा अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने पुढील सुनावणी लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे आज मंगळवारी निश्चित केली आहे. सोनसडा येथे मडगाव पालिकेने कायमस्वऊपी कार्यालय सुरू करण्याचा आदेश न्यायालयाने बजावला आहे. सोनसडा कचरा प्रश्नावरील याचिका काल सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणीस आली तेव्हा न्यायालयाने मडगाव नगरपालिकेची चांगलीच कानउघाडणी केली. सोनसडा कचरा प्रश्न सोडविण्यासाठी मडगाव पालिका उशीर लावत असून त्याचाच परिणाम म्हणून तो प्रश्न आता मोठी आपत्ती झालेली आहे. या कचरा प्रश्नाकरीता मडगाव पालिका सातत्याने मुदतवाढ मागत असून त्याबाबत न्यायालयाने असमाधान व्यक्त केले आहे. मडगाव पालिकेच्या अभियंत्यांनी तेथे तातडीने कायमस्वऊपी कार्यालय सुरू करावे, असाही आदेश न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या दणक्याने मडगाव नगरपालिकेची धावपळ उडाली असून दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सोनसडा येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचा अहवाल ते आजच्या सुनावणीवेळी न्यायालयासमोर सादर









