परतीच्या प्रवासाठी जिह्यातून आज 728 गाडय़ा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर चारमानी आता परतीच्या प्रवासाठी लागले आहेत़ मंगळवारी जिह्यातून सुमारे 728 एसटीच्या गाडय़ा सोडण्यात येणार आहेत़ सर्व गाडय़ांचे बुकींग फूल झाले आह़े चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी गरजेनुसार आणखी गाडय़ा सोडण्यात येतील अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आह़े
गणेशोत्सवासाठी मोठय़ा संख्येने चाकरमानी रत्नागिरी जिह्यात दाखल झाले होत़े कोकणात पाच दिवसांच्या गणपतींची प्रतिष्ठापणा मोठय़ा संख्येने होत असत़े सोमवारी 1 लाख 66 हजार घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आल़े यानंतर मुंबई, पुण्यातील चाकरमानी आपल्या परतीच्या प्रवासाठी निघाले आहेत़ प्रवासासाठी नेहमीप्रमाणे एसटी बसला प्राधान्य चाकरमान्यांकडून देण्यात आले आह़े एसटीकडून साधी, सेमी व शिवशाही बस सज्ज करण्यात आल्या आहेत़
सोमवारी जिह्यातून सुमारे 728 गाडय़ा सोडण्यात येणार आहेत़ यामध्ये दापोली आगारातून 103, खेड 76, चिपळूण 121, गुहागर 97, देवरूख 93, रत्नागिरी 49, लांजा 62, राजापूर 73 तर मंडणगड आगारातून 50 एसटी बस सोडण्यात येणार आहेत़ यामधून सुमारे 32 हजार चाकरमानी एका दिवशी एसटीच्या सेवेचा लाभ घेणार आहेत़
दरम्यान परतीच्या प्रवासाठी एसटी महामंडळाकडून प्रासंगिक करार देखील करण्यात आले आहेत़ ग्रामीण भागातून चाकरमनी यांना मुंबईत जाण्यासाठी एसटी बस उपयुक्त ठरताना दिसून येत आहेत़ गणेशोत्सवाच्या माध्यमातून एसटीला मोठे आथिक उत्पन्न देखील प्राप्त होत आह़े मागील दोन वर्ष कोरोनामुळे व कर्मचाऱयांच्या संपामुळे एसटी प्रशासनाला तोटा सहन करावा लागला होत़ा आता एसटीची वाहतूक पूर्वपदावर येत असून प्रवाशांची गैरसोय दूर झाली आह़े
रत्नागिरी विभागातून मुंबईकडे सुटणाऱया एसटी बस
आगार 6 सप्टेंबर 2022
मंगणगड 50
दापोली 105
खेड 76
चिपळूण 121
गुहागर 97
देवरूख 93
रत्नागिरी 49
लांजा 62
राजापूर 73
एकूण 728









