वार्ताहर/किणये
नेहरू स्टेडियम,बेळगाव येथे झालेल्या तालुकास्तरीय दसरा क्रीडा स्पर्धेतील थ्रो बॉल स्पर्धेमध्ये बेळगाव वॉरियर्स संघाने प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संघातील खेळाडूंचे कौतुक होत आहे. आपल्या प्रतिस्पर्धी संघांवर त्यांनी चांगल्या प्रकारचे खेळाचे चांगल्या प्रकारच्या खेळाचे प्रदर्शन करून विजेतेपद मिळवले आहे.या संघात मच्छे ,मंडोळी व काही बेळगाव येथील खेळाडूंचा समावेश असून संघामध्ये श्रीहरी लाड, आकाश लाड, सुरज देसाई, केशेव. सिद्धार्थ, सुनील, सिद्धार्थ, वैभव, प्रसाद, वैभव, प्रज्वल, सुजल, बाळासाहेब या खेळाडूचा समावेश आहे.









