बेळगाव : चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर लोकनियुक्त सभागृह अस्तिlवात येणार असून, महापालिका प्रशासकीय कालावधीचा आज शेवटचा दिवस आहे. सोमवार दि. 6 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून महापौर-उपमहापौर निवड प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवेकानी बेळगाव महानगर पालिकेत भगवा फेटा बांधून बेळगाव कारवार बिदर भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आशा घोषणा देत महानगरपालिकेत व सभागृहात प्रवेश केला.
आज महापौर-उपमहापौर होणार असून संपूर्ण बेळगावकरांचे याकडे लक्ष लागले आहे. सध्या महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी बेळगाव महापालिकेवर कायम मराठी भाषिकांचे वर्चस्व राहील आहे. तसेच सध्या सभागृहात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांची संख्या आहे. तरी संयुक्त महाराष्ट्राची भावना तसू भर ही कमी झाली नाही हे आज संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत महानगरपालिकेत व सभागृहात प्रवेश करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवेकानी दाखवून दिले.









