प्रतिनिधी/ बेळगाव
म. ए. समितीच्यावतीने मुंबई येथे मंगळवार दि. 28 फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. मुंबई येथील आझाद मैदानावर त्यासाठी सकाळी 10 वा. कार्यकर्त्यांनी पोहोचायचे आहे. कार्यकर्त्यांच्या सोयीबाबत सर्व तयारी करण्यात आली असून, कार्यकर्त्यांनी त्यासंदर्भात अधिक माहितीसाठी तालुका म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रेल्वेने जाणाऱ्या कार्यकर्त्यांनी मंगळवार दि. 28 रोजी सकाळी 7.00 वाजेपर्यंत भारती क्रीडा मंदिर सीपीएड कॉलेज नायगाव क्रॉस वडाळा येथे पोहोचायचे आहे. त्यानंतर अॅड. एम. जी. पाटील मोबा. क्र. 9448437141, आर. एम. चौगुले 9448487595, भागोजी पाटील 9035387021 यांच्याशी संपर्क साधावा.
पश्चिम भागातील कार्यकर्त्यांनी पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले आर्ट्स व सायन्स कॉलेज डोंगरा व आव्हाड आयपी पनवेल येथे त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याबाबत माहितीसाठी माजी आमदार मनोहर किणेकर 9448486254, शिवाजी सुंठकर 9448849887, आर. आय. पाटील 9448161763, पुंडलिक पावशे 8861304644 यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
याचबरोबर पूर्वभागातील कार्यकर्त्यांनी वाशी, नवी मुंबई येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज सेक्टर क्र. 15/अ याठिकाणी पोहोचायचे आहे. अधिक माहितीसाठी सुनील अष्टेकर 9448274989, रामचंद्र मोदगेकर 9972521062 यांच्याशी संपर्क साधावा. कोणत्याही अडचणी आल्यास अॅड. एम. जी. पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









