वृत्तसंस्था/ इंफाळ
मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम. सुंदर यांना मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. कायदा मंत्रालयाने रविवारी वक्तव्य जारी करत यासंबंधी माहिती दिली आहे. न्यायाधीश सुंदर हे रविवारी वर्तमान मुख्य न्यायाधीश केम्पैया सोमशेखर हे सेवानिवृत्त झाल्यावर कार्यभार सांभाळणार असल्याचे कायदा मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने गुरुवारीच विविध उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांच्या स्वरुपात पदोन्नतीसाठी तीन न्यायाधीशांच्या नावांची शिफारस केली होती. कॉलेजियमनने कर्नाटक उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश पवनकुमार बी. बजंथरी यांना पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सौमेन सेन यांना मेघालयाचे मुख्य न्यायाधीश अणि मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुंदर यांना मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची शिफारस केली होती.









