तेलंगणात पक्षाला मोठा झटका
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणात काँग्रेसला मोठा झटका देत वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री एम. शशिधर रेड्डी यांनी मंगळवारी पक्षाला रामराम ठोकण्याची घोषणा केली आहे. आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एम. चेन्ना रेड्डी यांचे पुत्र असलेल्या एम. शशिधर यांनी एका पत्रकार परिषदेला संबोधित करत काँग्रेस नेतृत्वावर आरोप केले आहेत. काँग्रेस राज्यातील सत्तारुढ तेलंगणा राष्ट्र समितीला प्रभावीपणे तोंड देण्यास सक्षम नाही. काँगेस पक्षात पैशांचा प्रभाव वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अलिकडेच तेलंगणातून महाराष्ट्रात पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर तेलंगणातील वरिष्ठ नेत्याने राजीनामा दिल्याने पक्षाला हा मोठा झटका आहे. रेड्डी हे आता टीआरएस का भाजपमध्ये प्रवेश करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.









