प्रत्येक गावाचा एकमुखी पाठिंबा : समिती देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचा निर्णय
वार्ताहर /गुंजी
बुधवारी गुंजी विभागामध्ये समितीच्या कार्यकर्त्यांनी गुंजीसह भालके बी. के., के. एच., कामतगा, आदी ठिकाणी संपर्क सभा घेऊन म. ए. समिती विषयी जनजागृती केली. या सर्व सभांना उस्फूर्तपणे प्रतिसाद देऊन म. ए. समिती जो उमेदवार उभे करील त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा एकमुखी निर्णय घेऊन पाठिंबा व्यक्त केला. सुऊवातीस गुंजी येथील श्री माउली देवी मंदिरामध्ये म. ए. समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देवीचा आशीर्वाद घेऊन गुंजी विभागामध्ये संपर्क सभांना सुऊवात केली. भालके बी. के येथील सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक मष्णू घाडी होते. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष यशवंत बिरजे यांनी समितीच्या कार्याचा आढावा घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नागरिकांनी सतर्क राहून समितीच्या विजयासाठी गावचा पाठिंबा देण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ नागरिक व समितीचे एकनिष्ठ कार्यकर्ते राजाराम देसाई म्हणाले, समितीतून पद मिळवून गद्दारी केली असा गद्दार पुन्हा समितीत निपजणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. माजी आमदार दिगंबर पाटील यांनीही या ठिकाणी भालके गावातील लोकांवर आपला विश्वास असून प्रत्येकवेळी हे गाव समितीच्या पाठीशी असल्याचे सांगितले. गावातर्फे सुभाष घाडी यांनी आपल्या संपूर्ण गावाचा एकमुखी पाठिंबा असल्याचे सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषण्या दिल्या. विठ्ठल चन्नेवाडकर, गेनाप्पा करंबळकर, संदीप शास्त्री, मिनाप्पा घाडी, भालके गावातील सर्व ग्रामस्थ, महिला बहुसंख्येने यावेळी उपस्थित होत्या.
भाषा टिकविण्यासाठी समितीच्या पाठीशी राहा
भालके के. एच. येथे घेतलेल्या संपर्क सभेमध्ये आबासाहेब दळवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. हलशी विभाग उपाध्यक्ष अर्जुन देसाई यांनी राष्ट्रीय पक्षांच्या आमिषाला बळी न पडता भाषा, संस्कृती टिकविण्यासाठी समितीच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. अध्यक्षस्थानी गोपाळराव देसाई होते. बाबाजी पाटील यांनी स्वागत करून गावचा पाठिंबा म. ए. समितीलाच राहणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी ग्राम पंचायत सदस्य विष्णू आळवणे, शिवाजी करंबळकर, ग्रा. पं. सदस्या यशोदा सुतार, लक्ष्मण आळवणे, मल्हारी आळवणे आदी ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा
कामतगा येथील नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये ग्राम पंचायत सदस्य हनुमंत जोशीलकर यांनी स्वागत केले. यावेळी कार्याध्यक्ष यशवंत बिरजे यांनी उपस्थित जनसमुदायासमोर समितीच्या कार्याचा उद्देश सांगून, शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन केले. खानापूर म. ए. समितीने उमेदवारीसाठी आवाहन केल्यानंतर समितीच्या सात शिलेदारानी 51 हजार देणगी निधीसह समितीकडे अर्ज केले आहेत. त्यातील एका इच्छुकाला समितीची उमेदवारी जाहीर होणार आहे. इच्छुकामध्ये निरंजनसिंह सरदेसाई, गोपाळराव पाटील, आबासाहेब दळवी, रुक्माण्णा झुंजवाडकर व मुरलीधर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कार्यकारिणीने सातपैकी कोणा एकास उमेदवारी मिळाल्यास आपण त्याच्या पाठीशी खंबीरपणे राहणार आहोत, असे वचन यावेळी दिले. माजी आमदार दिगंबर पाटील यांनीही विचार मांडले. सभेस गुंजी विभाग म. ए. चे उपाध्यक्ष कृष्णा मन्नोळकर, खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, दीपक देसाई, विठ्ठल गुरव, राजाराम देसाई, अमृत पाटील, कामतगा ग्रामस्थ सयाजी पाटील, यल्लाप्पा पाटील, के. वाय. चोपडे, बबन सुतार, शंकर पाटील, परशराम अनगडकर, अऊण अनगडकर, अशोक गवाळकर, परशराम नाईक, मोनेश्री पाटील, अंकुश नाईक, महाबळेश्वर अनगडकर, मष्णू जोशीलकर, कल्लाप्पा कौंदलकर, पुंडलिक जोशीलकर, विक्रम पाटील, मनोज पाटील, हनमंत सुतार, नामदेव जोशीलकर, सुरेश जोशीलकर आदी उपस्थित होते. बबन सुतार यांनी आभार मानले.









