वार्ताहर /हिंडलगा
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार व युवानेते आर. एम. चौगुले हे बुधवार दि. 19 रोजी सकाळी 10.30 वाजता आपला उमेदवारी अर्ज निवडणूक विभागाकडे दाखल करणार आहेत. धर्मवीर संभाजी चौक येथून ठीक 10.30 वा. मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. ही मिरवणूक धर्मवीर संभाजी चौक येथून चन्नम्मा चौक ते रिसालदार गल्ली येथील तहसीलदार कार्यालयापर्यंत निघणार आहे. तरी या मिरवणुकीत बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, युवा आघाडी, ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला व सीमाबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठी अस्मितेचे दर्शन घडवावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच सर्वांनी भगवी शाल, टोपी किंवा भगवा ध्वज हाती घेऊन मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे कळविण्यात आले आहे.









