वृत्तसंस्था/ पॅरिस
सॅगेच्या मार्गदर्शनाखाली लियॉन फुटबॉल संघाने फ्रेंच लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात निसचा निसटता पराभव करत पूर्ण गुण वसूल केले.
शुक्रवारी झालेल्या या सामन्यात लियॉन संघातील बेल्जियमच्या ओरेल मॅनगेलाने एकमेव निर्णायक गोल केला. या स्पर्धेत आतापर्यंत सात वेळेला विजेतेपद मिळविणाऱ्या लियॉन संघाला गेल्या नोव्हेंबर महिन्यात सॅगे यांचे मार्गदर्शन सुरू झाले. त्यावेळी हा संघ गुणतक्यात शेवटच्या स्थानावर असून त्यांनी आतापर्यंत 12 सामन्यातून केवळ एकमेव सामना जिंकला होता. आता लियॉन संघाचा गेल्या आठ सामन्यातील हा सहावा विजय असून त्यांनी एकूण सहा गुण मिळविले आहेत.









