न्हावेली / वार्ताहर
Luncheon for deaf and dumb students of Kondura on the occasion of Parasuram Uparkar’s birthday
माजीआमदार तथा मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी मनसेच्या वतीने म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या माध्यमातून कोंडुरा येथील माऊली मूकबधिर व कर्णबधिर विद्यालयात येथील विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करून श्री उपरकर यांचा वाढदिवस येतील लहान विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच मनसेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मनसेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार जिल्हा सचिव संदेश शेटये माजी तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक माजी तालुका सचिव आबा चिपकर माजी शाखाध्यक्ष प्रवीण आरोसकर सुरेंद्र कोठावळे म.न.वि.से शहराध्यक्ष निलेश देसाई सुनील नाईक आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने सदर कार्यक्रमास उपस्थित होते.









