बेळगाव : भाद्रपद पौर्णिमा रविवारी (ता. 7) रोजी असून तिला प्रौष्ठपदी पौर्णिमा असे म्हटले जाते. शनिवारी (ता. 6) उत्तर रात्री 1.41 नंतर पौर्णिमा सुरू होत आहे. रविवारी रात्री 11.38 पर्यंत पौर्णिमेचा कार्यकाळ आहे. या पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण होणार असून ते भारतातून दिसणार आहे. पंचांगातील माहितीनुसार ग्रहण प्रारंभ स्पर्श रात्री 9.57 वा., खग्रास स्थिती प्रारंभ रात्री 11.01 वा., खग्रास स्थिती समाप्ती रात्री 12.23 वा., ग्रहण समाप्ती अर्थात मोक्ष उत्तर रात्री 1.27 वा. आहे.
राशीनुऊप मिळणारी फलश्रुती याप्रमाणे-मेष, वृषभ, कन्या, धनू या राशींना शुभ ; मिथून, सिंह, तूळ, मकर यांना मिश्रफल व कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन या राशींना अशुभ आहे.
खंडग्रास सूर्यग्रहण
भाद्रपद अमावास्या रविवार दि. 21 सप्टेंबरला आहे. या दिवशी खंडग्रास सूर्यग्रहण होणार आहे.हे ग्रहण भारतातून दिसणार नसल्याने ग्रहणविषयक नियम पाळण्याची गरज नाही. पॅसिफिक महासागर, मेक्सिको, उत्तर अमेरिका, कॅनडा, अॅटलांटिक महासागर येथून दिसणार असल्याची माहिती पंचांगात देण्यात आली आहे.









