कसबा बीड/ प्रतिनिधी
महे तालुका करवीर येथे जिल्हा परिषद पशु विभाग व ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने लंपी आजार जनजागृती व पशु आहार मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमास जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी अधिकारी डॉ.युवराज शेटे,करवीर पंचायत समिती माजी सदस्य राजेंद्र सूर्यवंशी,ग्रामपंचायतचे सरपंच सज्जन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.
शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते.त्यासाठी निसर्गाची साथ ही गरजेची असते.अशा वेळेस अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यास पशुपालन या दुय्यम व्यवसायाने आज पर्यंत तारले आहे.पण गेले काही दिवस पशु व्यवसायामध्ये सुद्धा अनेक समस्या निर्माण होऊन यामध्ये प्रामुख्याने लंपी नावाच्या आजाराने पशुपालन व्यवसाय मोडकळीस आला आहे.अशा परिस्थितीत काय केले पाहिजे?कशा पद्धतीने या आजारावर मात केली पाहिजे ? या व अनेक प्रश्नांवर योग्य मार्गदर्शन व्हावे,यासाठी जिल्हा परिषद विभाग,करवीर पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने महे येथे घर टू घर सर्वे करून जनावरांची पाहणी करण्यात आली.लंपिग्रस्त जनावरांना औषध उपचार व प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.’माझा गोठा स्वच्छ तर जनावरे मस्त’ या संकल्पनेचा वापर करून शेतकऱ्यांनी आपला गोठा स्वच्छ ठेवावा.लंपीग्रस्त जनावरांची नोंद करून वेळेत उपचार करणे गरजेचे आहे,असे युवराज शेटे पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद विभाग सांगितले.
लंपी या आजाराने शेतकरी वर्ग गोंधळलेला आहे.अशावेळी गोंधळून न जाता आजारी जनावरांची जि प.पशु दवाखाना व डॉक्टर्स यांच्या सहकार्याने वेळीच उपाययोजना करून घ्याव्यात.यासाठी शासनाने अनेक योजना राबविल्या आहेत,याचा लाभ घ्यावा,असेराजेंद सुर्यवंशी माजी सभापती व सदस्य करवीर पंचायत समिती यांनी आपले मनोगतात सांगितले.यावेळी महे ग्रामपंचायतचे सरपंच सज्जन पाटील,सदस्य एस डी जरग ,करवीर पंचायत माजी सदस्य राजेंद्र सूर्यवंशी,युवराज पाटील,बुद्धीराज पाटील ,जगदीश पाटील,उपसरपंच व सर्व सदस्य ,शेतकरी वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









