मालगावात घडली घटना; अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल
सातारा प्रतिनिधी
मालगाव ता. सातारा गावात राहत असलेल्या एका घरात शुक्रवारी अज्ञात इसमाने प्रवेश केला. यावेळी खोलीत झोपलेल्या वृद्ध महिलेला सुरीचा धाक दाखवून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. या बाब घरातील इतर सदस्यांना कळताच त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञाताविरूद्ध तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 सप्टेंबर रोजी 1.45 ते 2.15 वाजण्याच्या सुमारास मालगाव, ता. सातारा येथील घराच्या मुख्य दरवाजा शेजारी असणारी खिडकी तोडून अज्ञात चोरटय़ांनी आत प्रवेश केला. यावेळी खोलीत वृद्ध महिला झोपली होती. ती जागी झाल्याने अज्ञाताने आरडा ओरडा करू नकोस असे म्हणत सुरी चा धाक दाखविला. यावेळी घरातील लाकडी कपाटात ठेवलेला 1 लाख 5 हजार रुपये किमतीचा सोन्याचा राणीहार, 1 लाख 5 हजार रुपये किमतीची सोन्याची मोहन माळ, 2 लाख 10 हजार रुपये किमतीचे सहा तोळे वजनाचे दोन सोन्याचे गंठण, 35 हजार रुपये किमतीचा एक तोळे वजनाचा सोन्याचे नेकलेस, 30 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठीसह सोन्याचा अन्यऐवज असा एकूण 5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेण्याची तक्रार श्रीकांत राजेंद्र पवार यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. तक्रार दाखल होताच उपविभागीय पोलीस अधिकारी आंचल दलाल यांनी भेट दिली.