मनाली पाटील ठरल्या मानकरी : इतर ग्राहकांना भेटवस्तू
बेळगाव : कलाश्री उद्योग समूह आयोजित चौथ्या योजनेतील 17 व्या ड्रॉच्या भाग्यवान विजेत्या देवगणहट्टीच्या मनाली पाटील ठरल्या. त्यांना अर्धा तोळे सोने देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश डोळेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून कंग्राळी येथील भाग्योदय महिला को-ऑप. सोसायटीच्या चेअरमन शीतल बर्डे, जांबोटी येथील वनदेवी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण कसर्लेकर, कणकुंबी येथील माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चिगुळकर, पुंडलिक पाटील, विठ्ठल राजगोळकर यासह इतर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कलाश्री ग्रुपच्यावतीने भेटवस्तू व बुके देऊन प्रकाश डोळेकर व सुकन्या डोळेकर यांनी गौरविले. मान्यवरांनी आपल्या मनोगतात कलाश्री उद्योग समूह व सोसायटीने ग्राहकांची विश्वासार्हता मिळविल्याचे आवर्जून सांगितले.
बंपर बक्षीस मनाली पाटील यांना देण्यात आले. उपविजेते मिक्सर ग्राईंडरचे मानकरी रोहिणी नाकाडी (बैलूर), उदयकुमार (इदगल-बागेवाडी), यमुना रेमाण्णाचे (धामणे), नारायण मुतगेकर (हंगरगा) हे ठरले. तसेच सुमन गोवेकर (बैलूर), सातेरी सावंत (देसूर), सुनील आजरेकर (विनायकनगर), सिद्धाप्पा तुक्काण्णाचे (देवगणहट्टी) यांनाही भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कलाश्री सोसायटी ठेव योजनेतील मागील ड्रॉच्या भाग्यवान विजेत्यांना 43 इंची कलर टीव्ही, रोख रक्कम, कॉर्नर सोफा सेट देण्यात आला. दहावीचे गुणवंत विद्यार्थी उत्तम पाटील, समर्थ पाटील, श्रावणी डोळेकर यांचा गौरव करण्यात आला. तसेच मनाली कुगजी यांनी दिव्यांग रामचंद्र कुगजी यांचा पती म्हणून स्वीकार करून यशस्वी संसार करत समाजासमोर आदर्श ठेवल्याबद्दल या दांपत्याचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन टी. डी. पाटील यांनी केले. वाय. बी. पोवार यांनी आभार मानले.









