वृत्तसंस्था/ लखनौ
इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सने कधीही यंदाच्या इतका वाईट काळ अनुभवलेला नसून आज सोमवारी येथे लखनौ सुपर जायंट्सविऊद्धच्या सामन्यात त्यांच्या फलंदाजांना संघाच्या तीव्र घसरणीला रोखण्यासाठी कामगिरी करावी लागेल. सीएसकेने सलग पाच सामने कधीही गमावलेले नाहीत, यात त्यांचा बालेकिल्ला असलेल्या चेपॉक येथे झालेल्या तीन सामन्यांचा समावेश आहे.
जर कोणी सीएसकेला संकटातून बाहेर काढू शकेल, तर तो धोनी आहे अशी भावना असली, तरी ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीनंतर त्याचे कर्णधारपदी परतणे देखील शुक्रवारी झालेल्या त्यांच्या मागील सामन्यात नशीब बदलू शकले नाही. घरच्या मैदानावर फिरकी गोलंदाजांविऊद्ध ते ढेपाळले. सर्वोत्तम फलंदाज गायकवाडही नसल्यामुळे त्यांचा पुनरागमनाचा प्रयत्न अधिक कठीण झालेला आहे. या संघातील पॉवर-हिटर्सचा अभावही चर्चेचा विषय बनला आहे.
सलामीवीर रचिन रवींद्र व डेव्हॉन कॉनवे हे दोन उत्तम फलंदाज आहेत, परंतु पहिल्या चेंडूपासून तुफानी फटकेबाजीची अपेक्षा करणे हे त्यांच्या खेळण्याच्या शैलीच्या विऊद्ध आहे. गायकवाडच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर येणारा राहुल त्रिपाठी कामगिरी करण्याच्या प्रचंड दबावाखाली असेल. संघाला अष्टपैलू रवींद्र जडेजाकडूनही अधिक योगदानाची आवश्यकता आहे, तर शिवम दुबेला पॉवर-हिटिंगच्या आघाडीवर अधिक पाठिंबा हवा आहे. त्यासाठी धोनी हा उत्तम पर्याय आहे. परंतु फलंदाजीच्या स्थानात सतत बदलामुळे धोनीसाठी काम कठीण झाले आहे.
दुसरीकडे एलएसजी सलग चौथ्या विजयाच्या शोधात असेल. मुख्य वेगवान गोलंदाजांना दुखापत झाल्याने स्पर्धेच्या सुऊवातीला त्यांची गोलंदाजी हा कमकुवत दुवा होता. परंतु शनिवारी येथे गुजरात टायटन्सवर विजय मिळवून देण्यात आवेश खान, रवी बिश्नोई आणि शार्दुल ठाकूर यांनी मोलाचा वाटा उचलला. लखनौची संथ खेळपट्टी फलंदाजीसाठी आणि निकोलस पूरनसारख्या खेळाडूंसाठी अनुकूल राहिलेली आहे. शनिवारी मिशेल मार्शच्या अनुपस्थितीमुळे रिषभ पंतला फॉर्ममध्ये असलेल्या एडन मार्करमसोबत सलामीला येण्याची संधी मिळाली. फॉर्मसाठी संघर्ष करणाऱ्या पंतने या स्थानावर समाधानकारक कामगिरी केली. पण मार्शच्या पुनरागमनानंतर तो स्वत:ला सलामीवीर म्हणून संधी देईल का हे पाहावे लागेल.
संघ-लखनौ सुपर जायंट्स : रिषभ पंत (कर्णधार), डेव्हिड मिलर, एडन मार्करम, आर्यन जुयाल, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रिट्झके, निकोलस पूरन, मिशेल मार्श, अब्दुल समद, शाहबाज अहमद, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, अर्शिन कुलकर्णी, आयुष बडोनी, शार्दुल ठाकूर, आवेश खान, आकाश दीप, मणिमरन सिद्धार्थ, दिग्वेश राठी, आकाश सिंग, शमर जोसेफ, प्रिन्स यादव, मयंक यादव, रवी बिश्नोई.
चेन्नई सुपर किंग्स : एम. एस. धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथीशा पाथीराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, सॅम करन, शेख रशिद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक हुडा, गुर्जनप्रीत सिंग, नॅथन एलिस, जेमी ओव्हरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्णन घोष, श्रेयस गोपाल, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.









