वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2023 च्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आरपीएसजी उद्योग समुहाच्या मालकीच्या लखनौ सुपर जायंट्स संघातील खेळाडूंना देण्यात येणाऱ्या नव्या जर्सीचे अनावरण मंगळवारी येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
2023 ची आयपीएल क्रिकेट स्पर्धा 31 मार्चपासून सुरू होणार आहे. 2022 च्या आयपीएल क्रिकेट हंगामात लखनौ सुपर जायंट्सने आपले पदार्पण केले होते. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार के. एल. राहुल तसेच या संघाचे फ्रांचायजी संजू गोयंका, संघाचे मेंटर गौतम गंभीर आणि बीसीसीआयचे सचिव जयेश शहा व अन्य मान्यवर या नव्या जर्सीच्या अनावरण समारंभाला उपस्थित होते. लखनौ सुपर जायंट्सच्या खेळाडूंना उपलब्ध करून देणारी ही नवी जर्सी निळ्या रंगाची असून या जर्सीवर एका बाजूला लाल रंगाच्या पट्ट्या आहेत. लखनौ सुपर जायंट्स संघाचे प्रमुख प्रशिक्षक झिंबाब्वेचे माजी कर्णधार अँडी फ्लॉवर तसेच गोलंदाज प्रशिक्षक आणि अँडी बिचेल, साहाय्यक प्रशिक्षक विजय दाहिया, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रिचर्ड हेलसॉल यावेळी उपस्थित होते.









