वृत्तसंस्था/ लखनौ
लखनौ सुपर जायंट्सची आज सोमवारी येथे सनरायझर्स हैदराबादशी गाठ पडणार असून या लढतीत आयपीएल प्ले-ऑफच्या शर्यतीत आव्हान जिवंत राहण्यासाठी ते शेवटचा प्रयत्न करतील. आतापर्यंत खराब कामगिरी केलेला रिषभ पंत यावेळी नव्या जोमाने सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल.
गेल्या वर्षी अंतिम फेरीत पोहोचलेला हैदराबाद संघ आधीच शर्यतीतून बाहेर पडला आहे, तर एलएसजीला तीन जोरदार विजयांसह 16 गुण मिळवता आले आहेत. त्यांना अंतिम चार संघांमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. एलएसजीचा नेट रन-रेट उणे 0.469 आहे, परंतु त्यांच्या तीन प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान पूर्णपणे संपल्याशिवाय त्यांना त्या टप्प्यात पोहोचणे जवळजवळ अशक्य आहे. हैदराबादचा विचार करता त्यांच्या काही खेळाडूंना लय परत मिळविण्याची ही संधी असेल. नितीशकुमार रे•ाr आणि इशान किशनसारखे खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी चांगल्या खेळी करण्यास उत्सुक असतील.
लखनौचा कर्णधार पंतचा वैयक्तिक फॉर्म हा चिंतेचा विषय असून 11 सामन्यांत 100 पेक्षा कमी स्ट्राईक-रेट आणि 12.80 च्या सरासरीने त्याला अवघ्या 128 धावा काढता आल्या आहेत. कसोटी उपकर्णधारपदासाठी पंतचे नाव चर्चेत आहे आणि आयपीएलचे स्वरुप वेगळे असले, तरी काही प्रभावी डाव खेळणे आणि संघाला विजय मिळवून देणे हे कोणत्याही मोठ्या घोषणेपूर्वी नेहमीच चांगले असते. एलएसजीला त्यांचा मुख्य फलंदाज निकोलस पूरन (410 धावा) याच्याकडून पुन्हा एकदा आक्रमक खेळ अपेक्षित असेल. कारण पहिल्या पाच-सहा सामन्यांमध्ये चांगली सुऊवात केल्यानंतर तो मंदावला होता.
दुखापतग्रस्त मयंक यादवच्या जागी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज विल्यम ओ’ रौर्के हा खेळाडू आला असून यादव पुन्हा एकदा अनिश्चित काळासाठी बाहेर पडला आहे. एलएसजी पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम (348 धावा) आणि मिशेल मार्श (378) यांच्यासह वरच्या फळीतील तीन फलंदाजांवर अवलंबून असेल. एलएसजीची समस्या ही आहे की, आयुष बडोनी (326) वगळता मधल्या फळीने अपेक्षेनुसार कामगिरी केलेली नाही आणि डेव्हिड मिलरलाही (160 धावा) शेवटच्या षटकांमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही.
एलएसजीची गोलंदाजी देखील खराब राहिली आहे. दिग्वेश राठी (12 बळी) हा त्यांचा उत्कृष्ट कामगिरी करणारा गोलंदाज आहे. त्यांच्या रवी बिश्नोईने खराब कामगिरी केलेली असून प्रति षटक 10 पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. वेगवान गोलंदाज आवेश खान (10 बळी) हा प्रत्येक हंगामाप्रमाणे सातत्यहीन राहिलेला आहे, तर चार सामन्यांमध्ये प्रति षटक 12.25 धावा दिल्यानंतर आकाश दीपला वगळावे लागलेले आहे. दुसरीकडे, हैदराबाद संघातील अभिषेक शर्मा (311 धावा) हा इंग्लंड दौऱ्यासाठीचा भारत ‘अ’ संघ निवडताना दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे नाराज असेल.
संघ: सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), इशान किशन, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, सचिन बेबी, स्मरण रविचंद्रन, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, हर्षल पटेल, कामिंदू मेंडिस, वियान मुल्डर, अभिषेक शर्मा, नितीशकुमार रे•ाr, मोहम्मद शमी, राहुल चहर, सिमरजित सिंग, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, इशान मलिंगा.
लखनौ सुपर जायंट्स : रिषभ पंत (कर्णधार), एडन मार्करम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, अब्दुल समद, डेव्हिड मिलर, शार्दुल ठाकूर, आवेश खान, आकाश दीप, दिग्वेश सिंह राठी, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, शाहबाज अहमद, मॅथ्यू ब्रेट्झके, हिम्मत सिंग, शामर जोसेफ, मणिमरन सिद्धार्थ, आर्यन जुयाल, आर. एस. हंगरगेकर, युवराज चौधरी, आकाश महाराज सिंग, अर्शिन कुलकर्णी.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7:30 वा.









