आतापर्यंत अनेक युद्ध मोहिमांमध्ये प्रत्यक्ष सहभाग
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांनी लष्कराच्या मुख्यालयात लष्करी मोहिमांचे (मिलिटरी ऑपरेशन्स) महासंचालक म्हणून शनिवार, 1 जुलै रोजी पदभार स्वीकारला. या पदाची धुरा हाती घेतल्यानंतर शर्मा यांनी वॉर मेमोरियल येथे शूरवीरांना आदरांजली वाहिली. यापूर्वी जीओसी एन. एस. राजा सुब्रमणी या पदावर कार्यरत होते. तसेच यापूर्वी प्रतीक शर्मा अंबाला येथे खड्गा कॉर्प्सचे कमांडिंग होते. त्यांनी गेल्यावषी 21 मार्च रोजी जनरल ऑफिसर कमांडिंगचा पदभार स्वीकारला होता. शर्मा हे राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि इंडियन मिलिटरी अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी ऑपरेशन पवन, ऑपरेशन मेघदूत, रक्षक आणि पराक्रम यासह अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. आयव्हरी कोस्टमधील प्रतिष्ठित युनायटेड नेशन्स मिशनचे जनरल ऑफिसर म्हणून ते सदस्य राहिले आहेत. तसेच श्रीलंकेतील ऑपरेशन पवन दरम्यान सक्रिय लढाईतही त्यांनी भाग घेतला होता.









