दिल्लीत आजपासून १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर १ हजार ७५७ रुपयांना मिळणार आहे. आजपासून दिल्ली ते पाटणापर्यंत एलपीजी सिलिंडर ३९.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. ही कपात केवळ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे. तर, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
यापूर्वी हे सिलिंडर १ हजार ७९६.५० रुपयांना मिळत होते. मुंबईत या सिलिंडरची किंमत १ हजार ७४९ ऐवजी १ हजार ७१० असेल. तर, चेन्नईमध्ये १९ किलोचा एलपीजी सिलिंडर १ हजार ९२९ रुपयांना विकले जाणार आहे. दरम्यान, १ डिसेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर वाढवण्यात आले होते. यापूर्वी १६ नोव्हेंबरला करवा चौथच्या दिवशी १९ किलोचा एलपीजी सिलेंडर १०० रुपयांनी महागला होता.









