गारगोटी प्रतिनिधी
प्रियेसीला भेटायला आलेला अल्पवयीन प्रियकर मुलीच्या घरच्यांना सापडला. त्याला झाडाला बांधून पोलिसांना फोन केला. बांधलेल्या दोरीला हिसडा मारून पळत असताना घाबरलेल्या प्रियकराचा विहिरी पडून मृत्यू झाला. शुभंकर संजय कांबळे (वय 17, रा. वाकीघोल, ता. राधानगरी) असे त्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद पोलीस पाटील शिल्पा कांबळे (पाचर्डे ता. भुदरगड) यांनी भुदरगड पोलिसात दिली आहे. दरम्यान तरूणाच्या कुटुंबाने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
याबाबतची माहिती अशी, शनिवारी रात्री पाचर्डे येथील अल्पवयीन प्रियेसीच्या घरातील लोक बुध्द पौर्णिमेनिमित्त बाजूलाच असलेल्या निष्णप या गावी गेले होते. घरी कोणी नसल्याचे पाहून त्या मुलीने आपल्या प्रियकराला घरी बोलावले. तो तिला भेटायला आला होता. रात्री अडीचच्या सुमारास कार्यक्रम संपल्यावर तिचे कुटुंबिय घरी आले. त्यांना तो आणि ती घरासमोरील झाडाखाली उभे असलेले दिसले. त्या दोघांना अशोक गोविंद कांबळे (रा. पाचर्डे) यांनी एकमेकांपासून वेगळे केले. रंगराव कांबळे व संजय साताप्पा कांबळे यांनी त्याच्या उजव्या हाताला दोरी बांधून त्यास गोविंद कृष्णा कांबळे यांच्या दारातील आंब्याच्या झाडाला बांधून घातले. त्यानंतर याची कल्पना पोलिस पाटील शिल्पा कांबळे यांना दिली. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
दरम्यान, शुभंकर याने पहाटे पावणे तीनच्या सुमारास हाताला हिसडा मारुन तेथून पळ काढला. आंधारातन पळून जात असताना गावातील लोक त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे लागले. गावकरी शोधत होते पण अंधार असल्याने तो सापडला नाही. रस्ता ओलांडून पुढे जात असताना अंधारात विहीर न दिसल्याने धोंडीराम गोविंद लाड यांच्या शेतातील विहीरीत पडला. त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह रविवारी सकाळी नऊ वाजता विहिरीत आढळला. रात्री उशिरापर्यंत शुभंकर याच्या घरची मंडळी घातपाताचा संशय व्यक्त करून पोलिस ठाण्यात तसा गुन्हा दाखल करण्यासाठी गर्दी करून उभे होते. अधिक तपास भुदरगड पोलिस करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









