वृत्तसंस्था/ ►नवी दिल्ली
टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेनने दाखल केलेली तक्रार, ज्यामध्ये कार्यकारी संचालक कर्नल अरुण मलिक यांनी त्यांच्याशी अनादरपूर्ण, लिंगभेदपूर्ण आणि अनुचित वर्तन केल्याचा आरोप केला आहे, तो अलिकडेच उघडकीस आला असून भारतीय बॉक्सिंग महासंघ त्याची चौकशी करीत आहे.
लवलिनाने क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, एसएआय, टॉप्स, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन (आयओए) आणि बीएफआयचे महासंचालक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. तिने त्यात म्हटले आहे की, मलिक यांनी 8 जुलै रोजी एसएआय आणि टॉप्स अधिकाऱ्यासोबत झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत तिचा अपमान केला होता. त्यांनी गप्प बसा, मान खाली घाल आणि आम्ही सांगतो तसे करा, असे म्हणत अनादरपूर्ण भाषण केले आणि हुकूमशाही वृत्ती देखील दाखवली. या तक्रारीवर विचार करून, टॉप्सचे सीईओ एनएस जोहल आणि आयओए अॅथलीट्स कमिशनचे उपाध्यक्ष शरथ कमल यांनी महिला वकिलांचा समावेश असलेली एक समिती स्थापन केली आहे.









