क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय सीबीएससी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगावच्या लव्हडेल शाळेचा संघ रवाना झाला आहे. उत्तर कर्नाटकातून या स्पर्धेत भाग घेणारा लव्हडेल संघ हा पहिला संघ आहे.
स्पोर्टींग प्लॅनेट मैदानावर राज्यस्तरीय सीबीएससी फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या लव्हडेल फुटबॉल संघाने बेंगळूरचा पराभव करत विजेतेपद पटकाविले होते. केरळ येथे होणाऱ्या सीबीएससी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी लव्हडेल फुटबॉल संघ सुशिल, विनस, बोअरा, राहुल, युनूस, साईतम, एडसन, सना, सिद्धार्थ, बिकास, रोहित, जोगेश, डॅनी, संतोष, बिका, रोनाल्डो आदी खेळाडूंचा समावेश आहे. तर या संघाच्या प्रशिक्षक म्हणून निखिल, अभिषेक, संतोष, हिमांशी गोर यांचा समावेश आहे. संघाला शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी इंचल व चेअरमन राज घाटगे, क्रीडा शिक्षक बसलिंगप्पा अगसगी व कमलेश यांचे प्रोत्साहन तर प्रमुख प्रशिक्षक मतिन इनामदार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









