अलीगढ
उत्तरप्रदेशच्या अलीगढमध्ये एका शासकीय शाळेत इयत्ता 7 वीतील विद्यार्थिनीसोबत मुख्याध्यापकाने लाजिरवाणे कृत्य केले आहे. मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीला प्रेमपत्र लिहून त्रास दिला आणि विवाहासाठी दबाव टाकला. याप्रकरणी पोलिसांनी मुख्याध्यापकाला अटक केली आहे. मुख्याध्यापकाचे नाव शकील अहमद असून त्याने छेडछाड केल्याने घाबरलेल्या विद्यार्थिनीने स्वत:च्या आईला घडलेला प्रकार सांगितला होता, त्यानंतर आईने त्वरित अतिरिक्त पोलीस अधीक्षकांची भेट घेत तक्रार नोंदविली. यानंतर पोलिसांनी पॉस्को कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवून घेत आरोपी शकील अहमदला अटक केली आहे. तर दुसरीकडे शिक्षण विभागाने आरोपी मुख्याध्यापक शकील अहमदला निलंबित केले आहे.









