Jr NTR- Louis Vuitton ज्युनियर एनटीआर हा टॉलीवूडचा एक स्टायलीश अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या स्टाईल स्टेटमेंटने तो नेहमीत चर्चेत असतो. अलीकडेच ज्युनियर एनटीआर हैद्राबादच्या विमानतळावर दिसल्याने चर्चित आला आहे. त्याच्याजवळ असलेल्या एका जबरदस्त लुई व्हिटॉन बॅगेमुळे माध्यमांचे पुन्हा आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यास यशस्वी झाला आहे. आपल्या प्रवासा दरम्यान त्याने वापरलेल्या छोट्या बॅगेची किंमत पाहून भल्या भल्यांची झोप उडालीय़.
जगतविख्यात असलेल्या ल्युईस व्हिटॉन या ब्रॅंडचे चाहते जगभरात आहेत. अनेक चित्रपट सेलिब्रेटी, उद्योगपती यांच्यासह राजकारण्यांनाही या ब्रँडची भुरळ पडलेली आहे. त्यातच आता ज्युनियर एनटीआर याने हा ब्रँड पुन्हा चर्चेत आणला आहे. या ब्रँडची उत्पादने ही अत्यंत महागडी म्हणून ओळखली जातातच पण त्याबरोबरच त्याच्या लक्झरिअस पणामुळे तो लोकप्रिय आहे.
ज्युनियर एऩटीआरची लुईस व्हिटॉन बॅगही त्याला अपवाद नाही. या बॅगेची किंमत तब्बल 5 लाख 60 हजार 427 रुपये आहे. विशिष्ट प्रकारची हस्तशैली आणि कारागिरीच्या टचमुळे या बॅगेची एव्हढी किंमत आहे. तीच्या वेगऴेपणामुळेच फॅशन जगतात ज्युनियर एनटीआरच्या स्टाईल आयकॉनच्या ईमेजला आणखी आधोरेखित करतो.
चांगल्या फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जाणारा ज्युनियर एनटीआर जेव्हा हैद्राबादच्या विमानतळावर दिसला तेव्हा त्याच्या आत्मविश्वासाबरोबरच त्याची लुई व्हिटॉन बॅग सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. कारण हा आयकॉनिक ब्रँड त्याच्या कोणत्याही वयोगटातील जनरेशला आवडणारे डिझाइन आणि प्रीमियम कलाकुसरीसाठी ओळखला जातो. बॅगच्या स्लीक डिझाईन आणि सिग्नेचर मोनोग्राम पॅटर्नमुळे ती आकर्षक तर दिसतेच शिवाय आरामदायी आणि स्टाईल यांचे मिश्रण यांचा मिलाफ आहे. ज्युनियर एनटीआर सध्या कोरटाला शिव दिग्दर्शित ‘देवरा’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.