बर्फाच्या आत 100 फूट खाली होते दफन
नासाच्या स्कॅनद्वारे ग्रीनलँडमध्ये बर्फाखाली दबलेले एक शहर सापडले आहे. ज्यापद्धतीने या शहराचा शोध लावण्यात आला आहे, त्या प्रक्रियेद्वारे वैज्ञानिक अंटार्क्टिकासारख्या वातावरणात बर्फाच्या थराची जाडी मोजत असतात. नासाच्या गल्फस्ट्रीम तृतीय जेटवर सवार वैज्ञानिकांनी एप्रिल महिन्यात उत्तर ग्रीनलँडच्या वर उ•ाण करताना आधुनिक रडार उपकरण युएव्हीएसएआरचा वापर केला, या तंत्रज्ञानाने बर्फाच्या खोलीत दडलेल्या स्ट्रक्चरला स्पष्ट स्वरुपात शोधण्यास मदत केली. वैज्ञानिकांकडून घेण्यात आलेल्या एका रडार छायाचित्राने बर्फाखाली दडलेल्या एका शीतयुद्ध कालीन शहराचा शोध लागला आहे.
वैज्ञानिक आणि इंजिनियर्सनी उत्तर ग्रीनलँडवरून उ•ाण करत असताना रडारद्वारे छायाचित्र काढले होते. या शहराचे नाव कॅम्प सेंच्युरी आहे. हे एक सैन्यतळ होते. 1959 मध्ये ग्रीनलँडच्या बर्फाच्या थराखाली भुयारांचे जाळे तयार करत हे शहर तयार करण्यात आले होते.
1967 मध्ये सोडण्यात आले शहर
1967 मध्ये या शहराला सोडण्यात आले होते. यानंतर त्यावर बर्फाचे थर जमा होत गेले, हे शहर पृष्ठभागापासून कमीतकमी 30 मीटर खाली बर्फात दबले गेले. नासाच्या जेट प्रोपल्शन लेबोरेटरीच्या एलेक्स गार्डनर यांनी आम्ही बर्फाची चादर शोधत होतो आणि कॅम्प सेंच्युरी दृष्टीपथास पडल्याचे सांगितले.
या भागाच्या मागील हवाई सर्वेक्षणांनी बर्फाच्या थराचे 2डी चित्र तयार पेले. तर एप्रिलमध्ये संशोधकांनी नाच्या युएव्हीएसएआर उपकरणाचा वापर केला, जे याचा 3डी मॅफ तयार करण्यास सक्षम होते. नव्या डाटाने या गुप्त शहराच्या संरचनांवर प्रकाश टाकला आहे. नव्या डाटाद्वारे या तळाच्या नियोजत लेआउटचा खुलासाझाला आहे. ज्यात अनेक एकसारख्या संरचना आहेत. तसेच यात अनेक प्रकारच्या भुयारी सुविधा दिसून येत असल्याचे नासाचे वैज्ञानिक चाड ग्रीन यांनी सांगितले आहे.
वितळणारा बर्फ तळ आणि त्याच्यासोबत दबलेल्या कुठल्याही शिल्लक जैविक, रासायनिक आणि किरणोत्सर्गी कचऱ्याला बाहेर काढू शकतात अशी भीती आहे.









