नुकसान भरपाई द्यावी- वेंगुर्ले तालुका शिवसेनेची मागणी.
Loss of paddy and horticulture due to bad weather
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेतीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी वेंगुर्ले तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख यशवंत परब यांनी वेंगुर्ले तहसीलदार प्रविण लोकरे यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख यशवंत परब यांनी बुधवारी शहर प्रमुख अजित राऊळ, युवा सेना प्रमुख पंकज शिरसाट, ओबीसी सेलचे निलेश चमणकर, नगरसेवक तुषार सापळे, तसेच डेलीन डिसोजा, हेमंत मलबारी, सुहास तोरसकर, वगैरे शिवसैनिकां समवेत भेट घेऊन निवेदन सादर केले.
या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, वेंगुर्ले तालुक्याच्या भौगोलिक रचनेनुसार 75 टक्के भाग हा भातशेती व फळबाग यावर अवलंबून आहे. आज हातातोंडाशी आलेली भातशेती व मोहर येण्याच्या स्थितीमध्ये असलेले आंबा काजू उत्पादन धोक्यात आले आहे. त्यामुळे येथील शेतकरी, बागायतदार हवालदिल झाले आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या भातशेतीचे व बागायतीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अन्यथा वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
वेंगुर्ले,/ प्रतिनिधी-









