प्रतिनिधी /वाळपई
सत्तरीत दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळात चरावणे येथील नवनाथ गावस यांच्या घरावर सागवानी झाड पडून घराची जवळपास दीड लाख रुपयांची हानी झाली.
चरावणे येथील नवनाथ गावस यांच्या घरावर सागवानी झाड पडल्यामुळे त्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली. घरातील सामानांची मोठय़ा प्रमाणात नासधूस झाली आहे. यामुळे नुकसानीचा अंदाज जवळपास दीड लाखांच्या आसपास आहे.
चरावणेत घरावर झाड पडल्याची माहिती वाळपई अग्निशामन दलाला दिल्यानंतर त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत घरावरील झाड हटविण्याचे काम सुरू होते. यावेळी स्थानिकांनी अग्निशामन दलाच्या जवानांना मदत केली. दलाच्या घरावरील झाड कापून बाजूला केले व लाखो रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश मिळविले असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱयांनी सांगितले.









