पार्से येथे चार चारचाकी गाडय़ांसह घरांवर झाडे कोसळली : वीजवाहिन्या तुटल्याने वीज पुरवाठा खंडित,अग्निशामक दलाची धावपळ

प्रतिनिधी /पेडणे
सोमवारी रात्री अवकाळी गडगडाटसह पाऊस व वादळी वाऱयाने वाहनांसह घरांवर झाडे पडल्याने पेडणे तालुक्मयात लाखो रुपयांचे नुकसान झाले. यावेळी संपूर्ण तालुक्मयात वीज पुरवाठा खंडित झाला. अनेक ठिकाण पडलेली झाडे कापून बाजूला करण्यासाठी पेडणे अग्निशामक दलाच्या जवानांची बरीच धावपळ झाली.
पेडणे कोर्ट जवळ फणसाचे झाड पडून रास्ता वाहतुकीसाठी बंद झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळ जाऊन रास्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. मधलावडा पार्से येथे मोठे आंब्याचे झाड पडून चार चारचाकी गाडय़ांचे तर एक डीओ दुचाकीचे नुकसान झाले. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांनी रात्री तीन वाजेपर्यंत चारही गाडय़ावरचे आंब्याचे झाड कापून बाजूला केले. या गाडय़ामध्ये पांडुरंग गावकर यांच्या मालकीची वॅगनर जीए 03 एन 7206 या गाडीचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. संदीप नागोजी यांची बलेनो जीए 11 ए 4918, जीए 01 आर 0942, रवी पुजारी यांची मारुती स्वीफ्ट गाडी क्र. जीए 03 आर 4918 व तनुजा पांडुरंग साळगावकर यांच्या डिओ दुचाकी असे एकूण सुमारे चार ते पाच लाखांचे नुकसान झाले.
पणशीवाडा-सरमळे पेडणे येथे बाबलो आरोंदेकर यांच्या घरावर आंब्याच्या झाडाची फांदी पडून घराचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले. तर पेडणे अग्निशामक दलाच्या जवानांनी एक लाखाहून जास्त मालमत्ता वाचवली. गिरकरवाडा हरमल येथे आगुस्तीन यांच्या घरावर वडाचे झाड तसेच चिकूचे झाड पडून सुमारे 20 हजार रुपयांचे, खालचावाडा हरमल येथे नारायण रेडकर यांच्या घरावर झाड पडून 20 हजार रुपयांचे नुकसान झाले. पोकेवाडा मोरजी येथे वीज वाहिन्या व कंपाऊंड हॉलवर झाड पडून नुकसान झाले. चोनसाई पार्से येथे भेंडीचे झाड पडून वीज वाहिन्या तुडल्या.
नाईकवाडा मांदे येथे जंगली झाड वीज वाहिन्यावर पडून नुकसान झाले. भाईडवाडा कोरगाव येथे वीज वाहिन्यांवर व रस्त्यावर झाड पडून नुकसान झाले. प्रज्ञा हायस्कूल देवसू येथे कंपाऊंडवर झाड पडून झाले. किरणपाणी येथे जंगली झाड रस्त्यावर पडले. हरिजनवाडा केरी येथे घरावर झाड पडून पाच हजार रुपयांचे नुकसान झाले. थोरलेबाग केरी येथे आंब्याचे झाड घरावर पडून तीन लाख रुपयाचे नुकसान झाले. या घटनेची माहिती माजी आमदार दयानंद सोपटे यांनी अग्निशामक दलाला दिली.
दाडाचीवाडी धारगळ येथे मुख्य रस्त्यावर झाड तसेच वाझरी येथे रस्त्यावर पडलेले झाड जवानांनी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पराष्टे येथे जंगली झाड वीज वाहिन्यावर व रस्त्यावर पडून रस्ता काही तास बंद राहिला. झाड पडल्याने वीज वाहिन्या तुटल्या. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी रात्री घटनास्थळी जाऊन पहाणी केली. त्यानंतर पेडणे अग्निशामक दलाच्या जवानानी येऊन हे झाड कापून बाजूला केले.
घटनेत अग्निशामक दलाचे अधिकारी नामदेव परवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अधिकारी प्रशांत धारगळकर, चालक विठ्ठल परब, प्रशांत सावळ देसाई, जवान शेखर मयेकर, जवान मनोज साळगावकर, जवान संदेश पेडणेकर, जवान रतन परब, आशीर्वाद गाड, मयुर नाईक, विकास चव्हाण, अमोल परब, अमित सावळ, प्रमोद गवंडी, केतन कामुलकर, राजेश परब यांनी पेडणे तालुक्मयात विविध ठिकाणी पडलेली झाडे कापून बाजूला करत अडथळा दूर केला.









