शॉर्ट सर्किटमुळे लागली आग : अग्निशामक दलाचे प्रसंगावधान : आग आटोक्मयात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
डिचोली / प्रतिनिधी
साखळी बाजारातील एका हॉटेलला बुध. दि. 9 नोव्हें. रोजी पहाटे लागलेल्या आगीत सदर हॉटेल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेत या हॉटेलचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले असून डिचोली अग्निशामक दलाने प्रसंगावधान राखून आग आटोक्मयात आणली. त्यामुळे साखळी बाजारातील मोठा अनर्थ टळला.
साखळी बाजारात असलेल्या संध्या नार्वेकर यांच्या सदर हॉटेलला बुधवारी पहाटे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. पहाटे 3.30 वा. च्या सुमारास हॉटेलमधून धुर येऊ लागला. तसेच आगीने पेट घेतला. या घटना परिसरात समजताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. लागलीच अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. वेळीच अग्निशामक दलाच्या जवानांनी दलाचे अधिकारी शैलेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली साखळीत धाव घेतली व बचावकार्याला प्रारंभ केला.
अग्निशामक दलाच्या जवानांनी हॉटेलमधील आग आटोक्मयात आणली. यावेळी नगरसेवक आनंद काणेकर यांनीही यावेळी उपस्थित राहून बचावकार्यात सहभाग घेतला. या आगीत हॉटेलमधील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून निकामी झाल्या. तसेच आतील बाकडे, फेन, फ्रिज व इतर वस्तू जळल्याने त्यांचे बरेच नुकसान झाले.