हिरेबागेवाडी येथील शेतकऱ्यांची कुलगुरुंकडे तक्रार
बेळगाव : हिरेबागेवाडी येथील राणी चन्नमा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसचे बांधकाम सुरू आहे. परंतु अवैज्ञानिकरित्या केलेल्या खोदकामामुळे पावसाचे पाणी साचून ते शेतामध्ये शिरत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अवैज्ञानिकरित्या सुरू असलेले काम थांबवून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या, अशी मागणी हिरेबागेवाडी येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी आरसीयुचे कुलगुरु त्यागराजन यांच्याकडे करण्यात आली आहे. राणी चन्नमा विद्यापीठाच्या प्रशस्त अशा कॅम्पसचे बांधकाम हिरेबागेवाडीजवळील मल्लनगुड्डा येथे सुरू आहे. विद्यापीठ होणार असल्याने शेतकऱ्यांनीही बांधकामाला सहकार्य केले. परंतु बांधकामासाठी खोदाई करण्यात आली असून ते वैज्ञानिवदृष्ट्या चुकीचे असल्यामुळे यामध्ये साचलेले पाणी शेतीमध्ये शिरले. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याकडे लक्ष पुरवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी बी. एस. गाणगी, मंजुनाथ वस्त्रद, संजय देसाई, आनंद नंदी यासह इतर शेतकरी उपस्थित होते.









