वाहनधारकांची गैरसोय, नव्याने बांधण्यासाठी निधी वाया
प्रतिनिधी /बेळगाव
शर्कत पार्कजवळ मागीलवषी बांधण्यात आलेले डेनेज चेंबर खचले असून प्रत्येक वर्षातून एकदा डेनेज चेंबरचे बांधकाम करावे लागत आहे. त्यामुळे डेनेज चेंबर बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. येथील कॉर्नरवर असलेले डेनेज चेंबर खराब झाल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शर्कत पार्कजवळील कॉर्नरवरील ड्रेनेज चेंबर खचले आहे. या मार्गावरून अवजड वाहनांसह दुचाकी वाहनधारकांची वर्दळ असते. मात्र प्रत्येकवषी येथील ड्रेनेज चेंबर खराब होत आहे. यावषीदेखील डेनेज चेंबर खचले असून सांडपाणी वाहत आहे. परिणामी येथील रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारकांना ये-जा करणे माश्कील बनले आहे.
स्वतंत्र्यता मार्गाची दुरवस्था झाली असून वाहनधारकांना वाहने चालविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशातच कॉर्नरजवळील रस्ता खचल्याने वाहनधारक खड्डा चुकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या ठिकाणी दुभाजक असल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. अवजड वाहनचालक खड्डा चुकविण्यासाठी वाहने रस्त्याच्या मधून जात असल्याने शर्कत पार्ककडून येणाऱया वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्मयता आहे. दरवषी येथील ड्रेनेज चेंबर खराब होत असल्याने नव्याने बांधण्यात येते. त्यामुळे डेनेज चेंबरच्या दर्जाचा मुद्दा उपस्थित झाला आहे.
काँक्रिटमध्ये असलेले डेनेज चेंबर बसवून या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी होत आहे.









