वृत्तसंस्था/पॅरिस
क्युबाचा 41 वर्षीय मल्ल मिजेन लोपेझने ग्रिकोरोमन कुस्ती प्रकारात चिलीच्या फर्नांडीझचा 6-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. लोपेझचे ऑलिम्पिक स्पर्धेतील हे सलग पाचवे सुवर्णपदक आहे. क्युबाच्या लोपेझने कुस्ती क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली आहे.
पुरूषांच्या 130 किलो वजन गटातील सुवर्णपदकाच्या लढतीत चिलीजच्या फर्नांडीझचा एकतर्फी पराभव केला. लोपेझचे ऑलिम्पिक स्पर्धेतील सलग पाचवे सुवर्णपदक आहे. या स्पर्धेनंतर लोपेझने आंतरराष्ट्रीय कुस्ती क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली. 2004 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत लोपेझने पहिलांदा आपला सहभाग दर्शविला होता. त्या स्पर्धेत लोपेझला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.









