साखर सहसंचालकांना दिले निवेदन; नियमबाह्य खर्च वगळून तोडणी, वाहतूक खर्चाचे नव्याने प्रमाणिकरण करण्याची मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी
कारखान्यांनी लावलेल्या उसाच्या तोडणी-वाहतुक खर्चाचे नियमाप्रमाणे प्रमाणिकरण करून त्याला मान्यता देण्याचे काम शासनाच्या विशेष लेखा परीक्षकांनी करणे अपेक्षित आहे. पण हे अधिकारी कारखान्यांच्या नियमबाह्य खर्चावर आक्षेप न घेता त्यांना मान्यता देरून शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये लुटायला मदत करत आहेत. त्यामुळे चोरी होरू नये म्हणून घातलेले कुंपनच शेत खात असल्याचा आरोप ‘आंदोलन अंकुश’ संघटनेने केला आहे. शासन आदेशात तरतूद नसलेल्या खर्चाला मान्यता देता येणार नसून हा खर्च वगळून तोडणी वाहतूक खर्चाचे नव्याने प्रामाणिकरण करण्याचे विशेष लेखा परीक्षकांना आदेश द्यावेत, या मागणीचे निवेदन ‘आंदोलन अंकुश’ संघटनेच्यावतीने साखर सहसंचालकांना दिले.
निवेदनात म्हटले आहे, रूस हंगाम 2022-23 मधील तोडणी वाहतुकीच्या खर्चात साखर कारखान्यांनी आपल्या शेती विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार, भत्ते, बोनस यांचा खर्च शेतकऱ्यांच्या तोडणी वाहतूक खर्चात नोंदवला आहे. आणि हा खर्च दीड ते साडेतीन कोटी रुपये प्रति कारखाना लावला आहे. रूस दराचे विनियमन अधिनियम 2013 चे नियम 2016 मधील कलम 8 ( ड ) मध्ये तोडणी वाहतूक खर्चात कोणते खर्च धरावेत हे नमूद आहे. तसेच तोडणी वाहतूक खर्चाबाबत 29 सप्टेंबर 2021 रोजी शासनाने परिपत्रक काढले आहे. त्या दोन्ही परिपत्रकामध्ये कारखान्याच्या शेती विभागाचा खर्च तोडणी वाहतूक खर्चात धरावा म्हणून उल्लेख केलेला नाही. त्यामुळे कारखान्यांनी लावलेला हा खर्च शासनाच्या विशेष लेखा परीक्षकांनी अमान्य करून मगच त्या खर्चाचे प्रामाणिकरण करणे आवश्यक आहे. पण त्यांनी या बेकायदेशीर खर्चाला मान्यता देरून कोल्हापूर सांगली जिह्यातील शेतकऱ्यांचे जवळपास 50 कोटी रुपये नुकसान केले आहे.
तोडणी वाहतूक मजुरांवरील खर्चामध्ये जे खर्च लावले आहेत, त्या खर्चाचे हिशोब पत्रके कारखान्यांनी दिलेले नाहीत. तसेच बिले न पाहताच लेजर बुक पाहून मान्यता दिली असल्याचे विशेष लेखा परीक्षकांनीच आपल्या पडताळणी अहवालात लिहिले आहे. आणि हे फार गंभीर आहे. हिशोब पत्रके कारखाना देत नसेल तर या खर्चांना मान्यताच देता येणार नाही. पण त्या खर्चाची पडताळणी न करताच लेखा परीक्षकांनी मान्यता दिली असल्याची निदर्शनास आली आहे. त्यामुळे या खर्चाची हिशोब पत्रके व खर्चाची मूळ बिले पाहून ( व्हारूचर व लेजर बुक न पाहता ) आणि सत्यता तपासून मान्यता देण्याच्या सूचना कराव्यात अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
‘गुरुदत्त शुगर’ च्या तोडणी, वाहतूक खर्चाची पुन्हा तपासणी करा
शिरोळ तालुक्यातील गुरुदत्त साखर कारखान्याची तोडणी वाहतुकीतील वाढ ही 13 टक्के झाली असून ही वाढ इतर कारखान्यांच्या वाढीच्या तुलनेत दुप्पट ते तिप्पटीने वाढली आहे. ही वाढ संशयास्पद असून यामुळे त्या कारखान्यास रूस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना 100 रुपये एफआरपी कमी मिळणार आहे. याची अन्य विशेष लेखा परीक्षकाकडून पुन्हा तपासणी करून (क्रॉस चेक) मिळावी अशी मागणी ‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चुडमुंगे यांनी साखर सहसंचालकांकडे केली आहे.








